ते बारा तास
" आभाळ चांगलं भरून आलंय तुम्ही निघा आता, नायतं अडकसान मधी!", असं अण्णानी बजावलं. कांदे लावायचं काम पूर्ण झालं नव्हतं, पण वातावरण असं झालं होतं की घरी निघण्यावाचून पर्याय नव्हता. बघता-बघता अख्खं आभाळ ढगांनी आ च्छादलं. खुरपं, कळशी आणि डबा घेऊन ५:३० वाजता मी आणि आई मोटारसायकलवर निघालो. अगदी ५ किमी पुढे पोहोचलो, पावसाचा जो र वाढला, एवढ्यातच जोरदार वीज कडाडली आणि त्या विजेच्या प्रकाशात जे दिसलं...! जुलै २०१७. पावसाळ्याचे दिवस होते आणि कांदा लागवड सुरू होती. मोठ्या वावरात 'गावरान कांदा' लावायचा होता. रोपांची खरेदी झाली होती आणि माणसांची जमवाजमव पण आदल्या दिवशीच केली होती. मी आणि आई एका तर बाबा दुसऱ्या मोटारसायकलवर घरून केंदूरला जाण्यासाठी निघालो. पोहोचल्यानंतर वाफे तयार करून त्यात चिखल तयार केला, रोपांच्या जुडया वाटल्या आणि कांदा लागवड सुरू झाली. वातावरण पाहता लागवड युद्धपातळीवर करावी लागणार हे स्पष्ट होतं! त्यादिवशी सूर्यनारायणाने दर्शन दिलंच नाही. जोरदार वाऱ्याबरोबर काळेकुट्ट ढग पुढे वाहून जाताना दिसत हो...
