सहजच
नमस्कार! बरेच दिवस डोक्यात विचारांचा गलका सुरू होता. काहीतरी लिहिण्याची इच्छा होती आणि मुहूर्त गवसला, तब्बल दोन वर्षांनंतर,थेट आज! शब्दांनी परिक्षा घेतली बहुतेक रुसले होते. त्यांचा रुसवा काढता काढता काही ओळी सुचल्या . नेमकी काल पौर्णिमा होती, चंद्राचं सौंदर्य काही औरच होतं.
सुधांशु
सहज गगनी अनिमिषपणे पाहावे
नि व्हावे तुझ्याशी एकरूप,
पौर्णिमेला..हेवा वाटावा असे रुप
मात्र अमावस्येला अदृश्याचे अप्रूप।
नित्याचे रजनीमागून येणे तुझे
वरुणात मेघांआड लपणे,
वाटे जणू रंगलाय खेळ दोहोंचा
उरे आमचे लाजून पाहणे।
शीतल छायेमुळे म्हणे शांततेचे प्रतीक
रत्नाकरा विचारले तेव्हा वाटला 'अगस्ती'क
थकलेले डोळे आता अर्धचंद्र झाले
मंद वार् याची झुळूक आली अन् .....
...... काळोखात रमले।।

अप्रतिम कविता ❤️❤️❤️❤️👍👍👌👌👌👌😆😆
ReplyDeleteVery nive
ReplyDeleteSuper
ReplyDelete